आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा संपन्न...

आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा संपन्न......
          दिनांक 18/ 12 /2013 रोजी प्राध्यापक एन .व्ही. पाटील मॅडम यांनी शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा याविषयी मार्गदर्शन केले.
      पाटील मॅडम यांनी शैक्षणिक साधन निर्मिती संकल्पना, शैक्षणिक साधनांची गरज व महत्त्व, शैक्षणिक साधनाचे प्रकार याविषयी मार्गदर्शन केले.
      त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर पी .बी .दराडे सर यांनी Use of media in teaching learning process याविषयी मार्गदर्शन केले. मीडियाचे फायदे व तोटे तसेच मीडियाचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती दिली.

        श्री प्रमोद कुंभार सर यांनी प्रभावी फलक लेखन कसे करावे तसेच विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन खडू कसा धरावा, रंगसंगती कोणती असावी .इत्यादी बाबींचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.
        दिनांक 19 /12 /2023 रोजी प्राध्यापक डॉ. आर. के. शेळके सर यांनी How to make your youtube channel ?घटकाची माहिती दिली .यामध्ये सरांनी स्वतःचा ईमेल आयडी वापरून स्वतःचे यूट्यूब चैनल कसे तयार करायचे याची माहिती सांगितली.
      दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी अनिल वारके सर यांनी How to create blog या विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये सरांनी स्वतःच्या अकाउंट काढून त्यामध्ये ब्लॉक कसे तयार करायचे याविषयी प्रात्यक्षिक सहित सखोल माहिती दिली.
  
       त्यानंतर प्राध्यापक सुधीर गुरव सर यांनी How to make 2D-3D teaching aids याविषयी मार्गदर्शन केले.
     यामध्ये सरांनी मॅजिक फोल्डर ,उडी चित्र कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि तसेच त्यांनी विद्यार्थ्यांकडून मॅजिक फोल्डर करून घेतले .अशा प्रकारे शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा छान पार पडली..

Popular posts from this blog

आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा....

श्री मौनी विद्यापीठ संचलित 'आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी 'शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक- 2 कुमार भवन शेेणगाव या प्रशालेमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपन्न....

श्री मौनी विद्यापीठ संचलित आचारी जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी ालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 अंतर्गत कुमार भवन शेणगाव या ठिकाणी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून परिपाठ सादरीकरण संपन्न