श्री मौनी विद्यापीठ संचलित 'आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी 'शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक- 2 कुमार भवन शेेणगाव या प्रशालेमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपन्न....
गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी कुमार भवन शेणगाव प्रशालेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .
स्वातंत्र्य दिनाची सुरुवात सर्वप्रथम प्रभात फेरीने झाली. प्रभात फेरीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री .कामत सर तसेच त्यांचे शिक्षक वृंद, सर्व छात्र प्रशिक्षणार्थी व प्रशालेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रभात फेरीमध्ये सहभागी छात्र प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी
प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली होती. विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
' प्रभात फेरीमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक '
प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी ध्वजारोहण करतानाचा क्षण...
ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी शेेणगाव गावच्या पहिल्या महिला सरपंच सौ. भारदस्त वहिनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ध्वजारोहण करतानाचा क्षण.....
आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
' राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना गावचे सरपंच, सर्व ग्रामस्थ, प्रशालेचे शिक्षक वृंद, छात्र प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी ...'
अशाप्रकारे ग्रामपंचायत शेेणगाव या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले.
कुमार भवन शेणगाव शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करताना उपस्थित सर्वजण.....
प्रशालेतील ध्वजारोहण माननीय साळोखे सर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत विद्यार्थिनींनी सादर केले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत देशाविषयीचे प्रेम व क्रांतिकारकांबद्दल आदर व्यक्त केला. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय ए .एच .कामत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून( 'एक तास स्वतःसाठी ,)या उपक्रमाची माहिती दिली व सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुमार भवन शेणगाव प्रशाले मध्ये भितीपत्रक प्रदर्शन व आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय ,गारगोटी शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 च्या छात्र प्रशिक्षणार्थींनी त्याचे आयोजन केले होते.
वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी समवेत छात्र प्रशिक्षणार्थी.....
स्वातंत्र्यदिना निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन छात्र प्रशिक्षणार्थींनी केले होते. विद्यार्थ्यांनी विविध भूमिका
साकारून क्रांतिकारकांचे योगदान आपल्या भूमिकेतून सांगितले.
साकारून क्रांतिकारकांचे योगदान आपल्या भूमिकेतून सांगितले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आर्ट अँड क्राफ्ट चे प्रदर्शन......
Art and craft Exhibition मध्ये विद्यार्थ्यांनी खूप सुंदर कलाकृती सादर केल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
सर्व छात्र प्रशिक्षणार्थींनी फलक लेखन केले होते.
सर्व छात्र प्रशिक्षणार्थी रांगोळी काढताना.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक बाजारी सर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाची सांगता प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय कामत सर यांनी आभार प्रदर्शनाने केली.
कार्यक्रमासाठी सरपंच ,,सर्व ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी ,प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
अशाप्रकारे कुमार शेेणगाव प्रशाले मध्ये स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.