श्री मौनी विद्यापीठ संचलित आचारी जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी ालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 अंतर्गत कुमार भवन शेणगाव या ठिकाणी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून परिपाठ सादरीकरण संपन्न
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी कुमार भवन शेणगाव येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे परिपाठ सादरीकरण झाले.
परिपाठ सादरीकरण करताना इयत्ता सहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी
परिपाठाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. व त्यानंतर अनुक्रमे प्रतिज्ञा ,प्रार्थना ,समूहगीत ,सुविचार ,पंचांग दिनविशेष ,बातम्या ,बोधकथा ,चिंतन ,इंग्रजी शब्द, इंग्रजी म्हण ,इंग्रजी कोडे, विनोद ,समीक्षण याचे सादरीकरण झाले.
परिपाठाचे सूत्रसंचालन करताना कुमारी आरोही वायचळ
सदरील परिपाठाचे सूत्रसंचालन आरोही वायचळ या विद्यार्थिनीने अतिशय उत्कृष्टपणे केले.'Importance of English Language ' या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला.
सर्व छात्र प्रशिक्षणार्थींनी परिपाठाचे फलक लेखन संकल्पनेला अनुसरून केले होते .
शेवटी परिपाठाचे समीक्षण शाळेतील शिक्षिका कोतमिरे मॅडम यांनी केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मार्गदर्शनही केले. त्यानंतर परिपाठाचे आभार आरोही वायचळ विद्यार्थिनीने केले.
अशा प्रकारे सदर परिपाठ सर्व विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका ज्योती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पार पाडला.