आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा....
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे सोमवार दिनांक 6/01/2025 रोजी स्थानिक लेखकाशी परिसंवादाचे तसेच सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व भितीपत्रकाचे उद्घाटन करून करण्यात आली.
कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे लेखक मार्गदर्शक प्राध्यापक सुनील देसाई सर यांनी नवसाहित्याची ओळख, पुस्तक परीक्षण व कथन या विषयावर उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रोफेसर डॉक्टर पी .एस .देसाई मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून वाचनाचे महत्त्व व गरज सांगितली. सदर उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक 4/01/2025 रोजी ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक परीक्षण व कथन घेण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बीएड द्वितीय वर्षाचे छात्रप्रशिक्षणार्थी ओंकार चौगुले व साक्षी पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती. तसेच बीएड द्वितीय वर्षातील छात्र प्रशिक्षणार्थी ओंकार चौगुले यांची सीआरपीएफ ट्रेडमनपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएड छात्रप्रशिक्षणार्थी आशा सावंत यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापक एस .आर .बाड मॅडम यांनी करून दिली. प्रास्ताविक ज्योती पाटील यांनी केले. तसेच बीएड प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्रप्रशिक्षणार्थींची मनोगत झाली. प्रोफेसर डॉ. आर .के. शेळके सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार छात्रप्रशिक्षणार्थी मयुरी पाटील यांनी केले.
महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, बीएड प्रथम व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.